Ashoke Pandit (PC- Twitter)

Ashoke Pandit Supports Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याक्त काश्मीसोबत केल्याने गेल्या काही दिवसांपासून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कंगनाच्या या वक्तव्यांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाचा तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. तसेच कंगनादेखील आपल्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना दिसून येत आहे. या वादानंतर अनेकांनी कंगनाची बाजू घेतली आहे. तसेच काहींनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक अशोक पंडित यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ‘एका स्त्रीने दिलेला शाप महागात पडतो,’ असंदेखील अशोक पंडित यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रनौतच्या कार्यालयावर महानगरपालिका कारवाई करत आहे, त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही - संजय राऊत)

अशोक पंडित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'एक स्वप्न उद्धवस्त झालं. देव तिला आणखी बळ आणि शक्ती देवो. एका स्त्रीचा शाप महागात पडतो संजय राऊतजी.' पंडित यांच्या या ट्विटला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.