Rakul Preet Singh Tests Positive For COVID-19: भारतात आजही कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज नेते तसेच कलाकार कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकले आहेत. यातील काहींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर काहींना यात आपले प्राण गमवावे लागले. दाक्षिणात्य तसेच बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रकुल प्रीत ने स्वत: आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. रकुल प्रीत ने यासंदर्भात माहिती देताना म्हटलं आहे की, 'मला सर्वांना सांगायचं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत: ला अलग केले आहे. माझी प्रकृती सध्या चांगली असून मी विश्रांती घेत आहे. कोरोनावर मात करून मी लवकरचं शूटवर परत येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी,' असं आवाहनदेखील रकुल प्रीतने केलं आहे. (हेही वाचा -Chhatrapati Shivaji Maharaj Viral Photo: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील 'हा' बॉलिवूड अभिनेता कोण आहे? जाणून घ्या)
दरम्यान, रकुल प्रीतने अजय देवगणच्या ‘मेडे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. या चित्रपटात अजय देवगण आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
😊💪🏼 pic.twitter.com/DNqEiF8gLO
— Rakul Singh (@Rakulpreet) December 22, 2020
अजय देवगनच्या नव्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. रकुलची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने चित्रपटाच्या शूटिंगला उशीर होण्याची शक्यता आहे. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मेडे चित्रपटाचे शूटिंग 11 डिसेंबरपासूनचं सुरू झाले आहे. 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.