Chhatrapati Shivaji Maharaj Viral Photo: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील 'हा' बॉलिवूड अभिनेता कोण आहे? जाणून घ्या
शिवाजी महाराजांच्या वेशात हा अभिनेता अगदी परफेक्ट दिसत आहे. त्यामुळे त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. खूप कमी लोकांना या वेशभूषेमागील चेहरा ओळखला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Viral Photo: सध्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या वेशातील एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो एका बॉलिवूड अभिनेत्याचा आहे. शिवाजी महाराजांच्या वेशात हा अभिनेता अगदी परफेक्ट दिसत आहे. त्यामुळे त्याला ओळखणंही कठीण झालं आहे. खूप कमी लोकांना या वेशभूषेमागील चेहरा ओळखला आहे. फार उत्सुकता न लावता आम्ही तुम्हाला या अभिनेत्याचं नाव सांगणार आहोत. बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटात काम करणाऱ्या आर माधवन (R. Madhavan) ने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली आहे. आर माधवनच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांनी भरभरून लाईक तसेच कमेंन्ट दिल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील आर माधवनचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. याशिवाय सध्या सोशल मीडियावर माधवनचा हा लूक चर्चेचा विषय ठरला आहे. (हेही वाचा -Ayushmann Khurrana New Film Doctor G: आयुष्मान खुराना 'डॉक्टर जी' चित्रपटात दिसणार डॉक्टरांच्या भूमिकेत; चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर दिला होकार)
दरम्यान, आर माधवनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपले काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना माधवनने म्हटलं आहे की, 'मला आतापर्यंत न मिळालेला रोल. यातील कोणता रोल माझ्यासाठी योग्य आहे आणि कोणता नाही.'
View this post on Instagram
माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो त्याच्या आगामी ‘रॉकेट्राय : नम्बी इफेक्ट’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं शुटिंग सुरू आहे. हा चित्रपट वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता शाहरूख खानदेखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2020 01:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

