Ayushmann Khurrana New Film Doctor G (PC - Instagram)

Ayushmann Khurrana New Film Doctor G: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आपल्या शानदार अभिनय आणि सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. आयुष्मान आपल्या चाहत्यांना सतत हिट चित्रपट देत आहे. त्याने 'बरेली की बर्फी', 'बधाई हो', 'विकी डोनर' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' यासारखे हिट चित्रपट केले आहेत. आता आयुष्मान जंगली पिक्चर्ससह एक फिल्म करणार आहे. ज्याच नाव 'डॉक्टर जी' असं असणार आहे. या चित्रपटातील आयुष्मानच्या व्यक्तिरेखेचे ​​नावदेखील ‘डॉक्टर जी’ असचं असेल. या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना आयुष्मानने सांगितलं आहे की, "डॉक्टर जी ची पटकथा मला आवडली आहे आणि मी त्याबद्दल लगेचचं होकार दिला आहे. कारण ही एक पूर्णपणे नवी कथा आहे आणि ती पूर्णपणे भिन्न आहे. अगदी पूर्णपणे नवीन कल्पनेवर आधारित, चित्रपट पाहून तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करणे," असंही आयुष्मानने म्हटलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती देताना आयुष्मानने म्हटलं आहे की, 'मी माझ्या कारकीर्दीत पहिल्यांदाच डॉक्टरची भूमिका साकारण्यासाठी खूप उत्साही आहे. या चित्रपटात दिलेल्या संदेशाच्या माध्यमातून मी थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.' (हेही वाचा - Drug Case: ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपालचा क्लीन चीट नाही; विधानात आढळली विसंगती, पुन्हा होऊ शकते चौकशी- NCB )

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करत आहेत. चित्रपटाची कथा एक विनोदी नाटक आहे. या चित्रपटासह प्रथमच अनुभूती दिग्दर्शनात आपला हात आजमावणार आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट असेल. याबाबत अनुभूती यांनी सांगितलं की, 'मी चित्रपट निर्मितीच्या कामात पूर्ण जोश घेऊन आले आहे. जंगल पिक्चर्स आणि प्रतिभावान आयुष्मान खुरानबरोबर काम करण्यास मी खूप उत्साही आहे.' (Antim- The Final Truth: सलमान खान सोबत Fight करतानाचा आयुष शर्मा चा व्हिडिओ आला समोर; पहा ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’ चित्रपटाचा टीझर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

अभिनेता आयुष्मान खुरानाने 2012 मध्ये विकी डोनर या रोमँटिक विनोदी चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. आयुष्मानने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुलाबो सीताबो' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याने भाडेकरूची भूमिका साकारली होती. तसेच आयुष्मानच्या आधीच्या 'बधाई हो' चित्रपटाने 2 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.