Antim- The Final Truth: सलमान खान सोबत Fight करतानाचा आयुष शर्मा चा व्हिडिओ आला समोर; पहा ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’ चित्रपटाचा टीझर
सलमान खानने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आयुष शर्मा सलमान खानसोबत Fight करताना दिसला आहे.
Antim- The Final Truth: सलमान खान (Salman Khan) त्याचा मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) सोबत ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसणार आहे. दोघांनीही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात आयुष शर्मा हा एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमान खान आयुष शर्मासोबत दिसला आहे. चित्रपटाच्या या क्लिपमध्ये आयुष शर्माची ताकदवान बॉडी दिसत आहे. त्याचवेळी सलमान खान शीख पोलिसांच्या भूमिकेत दिसला आहे. दरम्यान, आयुष शर्माने या चित्रपटासाठी जबरदस्त बॉडी बनवली आहे. जी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या क्लिपमध्ये सलमान आणि आयुष शर्मा यांच्यातील लढाई चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करत आहे.
‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा हे प्रथमच पडद्यावर अशा प्रकारे झगडताना दिसणार आहेत. अद्याप चित्रपटासंदर्भात फारशी माहिती समोर आलेली नाही. परंतु, व्हिडिओमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा जबरदस्त अंदाज पाहण्यासारखा आहे. (हेही वाचा - KGF Chapter 2: प्रसिद्ध अभिनेता यश आणि संजय दत्त यांच्या 'केजीएफ चॅप्टर 2' चित्रपटाचे पोस्टर लाँच; 'या' दिवशी होणार टीझर रिलीज)
या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री महिमा मकवाना देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाविषयी बातमी समोर आली होती की, महिमा चित्रपटाच्या सेटवर उप्स मोमेंटची शिकार झाली होती. मात्र, त्यावेळी महिमाने अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रसंग हाताळला होता.
View this post on Instagram
सलमानची धाकटी बहीण अर्पिताचा पती आयुष ने बॉलिवूड करिअरची सुरूवात लवयात्री या चित्रपटापासून केली होती. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिस जास्त चालला नाही. त्यानंतर आता सलमान आयुषसाठी एक अॅक्शन फिल्म तयार करत आहे. आयुषने या चित्रपटासाठी स्वत: चा जबरदस्त मेकओवर केला असून जिममध्ये घाम गाळून शरीरसृष्टीची उत्तम निर्मिती केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2020 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

