बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. कंगनाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार तिला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंरत तिने मनाली (Manali police Station) पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, कंगना रनौत हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी मिळाली. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी आणि चर्चेत असलेली कंगना मिळालेल्या धमकीमुळेही चर्चेत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कंगना रनौत हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी भारती दंड संहितात कलम 295 (अ), 504, 505,506,509 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कंगना रनौत हिने मनाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कंगनाच्या तक्रारीबद्दल कुल्लूचे पोलीस अधिक्षक गुरदेव शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. (हेही वाचा, शीख समाजाबद्दल टिप्पणी केल्याने दिल्ली विधानसभेच्या शांति-सद्भाव समितीकडून Kangana Ranaut हिला समन्स)
कंगना रनौत ने मनाली पुलिस स्टेशन में एक शिकायत पत्र दिया है जिसमें उन्होंने लिखा कि उनको सोशल मीडिया पर एक व्यक्ति ने जान से मारने की धमकी दी है। पुलिस ने धारा 295 ए, 504, 505, 506, 509 आईपीसी के तहत मामला दर्ज़ किया है: गुरदेव शर्मा, एसपी कुल्लू pic.twitter.com/ZpWIN2Hjzr
— ANI_HindiNews (@AHindinews) November 30, 2021
आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन कंगना नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिच्या विधानावरुन जोरदार टीकाही झाली आहे. नुकतीच तिने शीखांसदर्भात एक व्यक्तव्य केले होते. यावरुन आम आदमी पक्षाचे आमदार दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी तिला समन्स पाठवले आहे. या प्रकरणात कंगना हिस येत्या 6 डिसेंबररोजी दुपारी 12 वाजता समितीसमोर हजर राहावे लागणार आहे.