शीख समाजाबद्दल टिप्पणी केल्याने दिल्ली विधानसभेच्या शांति-सद्भाव समितीकडून Kangana Ranaut हिला समन्स
Kangana Ranaut (Photo Credits: Instagram)

देशाची राजधानी दिल्ली विधानसभेच्या शांति आणि सद्भाव समितीने अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला समन्स धाडले आहेत. तर समितीने कंगना हिला येत्या 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. शीख समाजाबद्दल करण्यात आलेली वादग्रस्त आणि अपमानजनक टिप्पणीमुळे कंगना हिला समन्स पाठवण्यात आले आहेच. याच पार्श्वभूमीवर विधानसभा शांति आणि सद्भाव समितीचे अध्यक्ष आम आदमी पार्टीचे आमदार राघव चड्ढा आहेत.(कृषी कायदे मागे घेतल्याने संतापली कंगना, पोस्ट शेअर करुन दिला प्रतिक्रिया)

खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने इंस्टाग्रामवर शीख समुदाच्या विरोधात कथित रुपात आपत्तीजनक टिप्पणी करण्यासंबंधित अभिनेत्री कंगना रनौत हिच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीत अभिनेत्री कंगना रनौत हिने शीख समुदायावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरवल्या आहेत.(Mukesh Khanna on Veer das: वीर दासच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुकेश खन्ना संतापले)

Tweet:

समिती द्वारे करण्यात आलेल्या विधानानुसार, रनौह हिच्या विरोधात ही तक्रार मंदिर मार्ग ठाण्याच्या साइबर ऑफिसमध्ये दाखल केली आहे. समितीचे असे म्हणणे आहे की, सोशल मीडियात करण्यात आलेल्या आपल्या पोस्टमध्ये कंगनाने मुद्दाम शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 'खलिस्तानी आंदोलन' म्हटले होते. त्याचसोबत वादग्रस्त भाषेचा वापर सुद्धा कंगनाने केला होता. तर शीख धर्मांच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जाव्यात याच दृष्टीने मुद्दाम ही पोस्ट करत सोशल मीडियात व्हायरल केली.