Tribhanga Trailer: बॉलिवूड अभिनेत्री काजोल च्या 'त्रिभंगा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पहा हृदयस्पर्शी कथा
त्रिभंगा ट्रेलर (Image Credit: Instagram)

Tribhanga Trailer: बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवणार आहे. यावेळी काजोल आपल्या ‘त्रिभंगा’ (Tribhanga) या नव्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ज्यात काजोल पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकण्याची शक्यता आहे. अजय देवगणने या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना अजय देवगणने 'कोणीही परिपूर्ण नाही. 15 जानेवारीपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे,' असं म्हटलं आहे.

या चित्रपटात काजोलसह मिथिला पालकर, तन्वी आझमी आणि कुणाल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून ही फॅमिली ड्रामा फिल्म असल्याचं समजतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केलं आहे. तसेच अजय देवगणने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (हेही वाचा - Kangana Ranaut On Urmila Matondkar: कंगना रनौत हिची पुन्हा एकदा उर्मिला मातोंडकर हिच्यावर टीका, जाणून घ्या नव्या वादाचे कारण)

रेणुका शहाणे यांनी 2018 मध्येचं या चित्रपटाची घोषणा केली होती. 2019 च्या वर्षापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. या चित्रपटामधून काजोल बर्‍याच दिवसानंतर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.