Torbaaz Trailer: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त च्या 'तोरबाज' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; अफगाणिस्तानात दिसला जबरदस्त लूक, पहा व्हिडिओ
Sanjay Dutt (Photo Credits: Facebook/ Film Fare)

Torbaaz Trailer: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt's) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिनेताच्या 'तोरबाज' (Torbaaz) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संजय दत्त स्टारर चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. तोरबाज, हा संजू बाबाचा असा दुसरा चित्रपट आहे, जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यापूर्वी त्यांचा आलिया भट्टसोबतचा सडक-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो प्रेक्षकांना आवडला नव्हता. मात्र, यावेळी संजय दत्तचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट 11 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपचं जबरदस्त दिसत असून चित्रपटाचे बहुतांश शूटिंग अफगाणिस्तानात झाले आहे. या चित्रपटात अभिनेत्या सोबत नर्गिस फाखरी दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त एका क्रिकेट कोचची भूमिका साकारत आहे. यात संजय दत्त अफगाणिस्तानमधील शिबिरात मुलांना क्रिकेट शिकविताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये संजय दत्तने या मुलांना बंदूक आणि दहशतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Indoo Ki Jawani: कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'इंदू की जवानी' थिएटरमध्ये 'या' तारखीला होणार प्रदर्शित)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

तोरबाज अशा माणसाची गोष्ट आहे, जो आपल्या वैयक्तिक त्रासातून मुक्त होऊन स्वत: काहीतरी करण्याचा दृढनिश्चय करतो. आत्मघाती बॉम्बर बनलेल्या शरणार्थी शिबिराच्या मुलांसाठी क्रिकेटमध्ये प्रशिक्षण देण्याचा त्यांचा निर्धार आहे. क्रिकेट कोच म्हणजेच संजू बाबा मुलांना या दलदलीतून बाहेर काढू शकतील की, नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मलिक यांनी केले असून यात संजय दत्त यांच्यासह नर्गिस फाखरी आणि राहुल देव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

संजय दत्तच्या कर्करोगाच्या बातमीनंतर प्रथमच अभिनेत्याच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. वास्तविक, संजय दत्तने कर्करोगाच्या उपचारादरम्यान काही दिवस कामापासून दूर जात असल्याची माहिती दिली होती. संजय दत्तवर मुंबईत उपचार झाले होते. संजय दत्तने कर्करोगाचा मुकाबला केला असून लवकरच तो चित्रपटाच्या सेटवर दिसणार आहे.