बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी झाला पिता; पत्नी निन दुसांज ने दिला चिमुकलीला जन्म
Aftab Shivdasani (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी (Aftab Shivdasani)  याच्या घरी इवल्याशा पाऊलांनी तान्हुलीचे आगमन झाले आहे. आफताबची पत्नी निन दुसांज (Nin Dusanj) ने एका चिमुकलीला जन्म दिला आहे. यामुळे यांच्या कुटूंबात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कन्यारत्नाचा लाभ झाल्याचा आनंद आफताबने सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. आफताबने आपल्या मुलीच्या पावलांचा फोटो शेअर करुन ही बातमी दिली आहे.

आफताबने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन खाली लिहिले आहे, "स्वर्गाचा एक छोटासा तुकडा देवाने जमिनीवर पाठवला आहे. देवाच्या आशीर्वादामुळे मला आणि निनला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. आम्हाला याचा खूप अभिमान आहे आणि आता आमचे 3 लोकांचे परिवार बनले आहे."

हेदेखील वाचा- Hardik Pandya Son New Pic: हार्दिक पांड्या ने शेअर केला लेकासोबत 'हा' खास फोटो; फॅन्सने केलं ज्युनिअर पांड्याचं स्वागत

या फोटोत आपल्या मुलीच्या पायाभोवती आपताब आणि त्याचा पत्नीने हाताने हृदयाचा आकार बनवून छान फोटो शेअर केला आहे.

आफताबने निन दुसांज सोबत 5 जून 2014 मध्ये लग्न केले होते. आफताबने मिस्टर इंडिया, शहनशाह आणि चालबाज चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर कसूर, आवारा पागल दिवाना, मस्ती, हंगामा यासारख्या चित्रपटात त्याने काम केले होते.