Bobby Deol Sits On The Floor To Watch Animal: बॉबी देओलने थिएटरमध्ये जमिनीवर बसून पाहिला 'अॅनिमल' चित्रपट; चाहत्यांचे प्रेम पाहून भावूक झाला अभिनेता
Bobby Deol Sits On The Floor To Watch Animal (PC - Instagram)

Bobby Deol Sits On The Floor To Watch Animal: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर 'अ‍ॅनिमल' (Animal) चित्रपट यावर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट एकामागून एक नवीन रेकॉर्ड बनवत आहे. 'अ‍ॅनिमल'ने दुसऱ्या दिवशी सर्व भाषांमध्ये अंदाजानुसार सुमारे 66 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रणबीरप्रमाणेच सनी देओलचा भाऊ बॉबी देओलच्या अभिनयाचीही खूप चर्चा होत आहे. बऱ्याच दिवसांनी बॉबी मोठ्या पडद्यावर दिसला आहे. बॉबी देओलच्या चित्रपटातील भूमिकेसाठी चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बॉबी देओलने जमिनीवर बसून पाहिला 'अॅनिमल' -

बॉबी देओलने इन्स्टावर त्याचे काही फोटो शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. बॉबी देओलने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पहिल्या छायाचित्रात तो थिएटरच्या फरशीवर बसून 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहत असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या छायाचित्रात बॉबी मीडिया कर्मचाऱ्यांसोबत पोज देताना दिसत आहे. अभिनेत्याची ही उदारता चाहत्यांची मने जिंकत आहे. हे फोटो शेअर करताना बॉबीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'मला मिळालेल्या सर्व प्रेम आणि कौतुकासाठी कृतज्ञ.. #Animal, आजच चित्रपट पाहा.' (हेही वाचा - Animal: Ranbir Kapoor सोबत ब्लॅक ब्रा मधील Rashmika Mandanna चे हॉट इंटिमेट सीन्स सोशल मीडियावर लीक)

चाहत्यांचे प्रेम पाहून अभिनेता झाला भावूक -

तथापी, बॉबी देओलचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्यावरच्या चाहत्यांचे प्रेम पाहून भावूक होताना दिसत आहे. चाहत्याचं प्रेम पाहून अभिनेत्याला अश्रू अनावर झाले आहेत. सध्या अभिनेत्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Animal OTT Release: अॅनिमल चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज, 'या' दिवशी Netflix वर प्रदर्शित)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

अॅनिमल चित्रपटात रणबीर कपूर आणि बॉबी देओल व्यतिरिक्त, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरीच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.