Pankaj Udas Birthday Special: गायक पंकज उदास यांच्या ह्या 5 गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर केले अधिराज्य
Pankaj Udas (Photo Credits: File Photo)

आपल्या सदाबहार गाण्यांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केलेले गायक पंकज उदास यांचा आज 68 वा जन्मदिवस आहे. पंकज उदास यांची गाणी जितकी दर्दभरी होती तितकीच ती मनाला भिडणारी होती. त्यामुळे कोणीही त्यांच्या गाण्यांकडे कंटाळवाणी असे न बघता मनाला शांत करणारी गाणी असेही पाहायचे. पंकज उदास यांचा जन्म 17 मे 1951 मध्ये गुजरातच्या जैतपूरमध्ये झाला. त्यांचे वडिल शेतकरी होते, मात्र त्यांच्या घरात सुरुवातीपासून संगीताला विशेष असे महत्त्व होते.

पंकज उदास यांच्या 'चिट्ठी आई है' ह्या गाण्याने अवघ्या देशाला वेड लावले. अशीच पंकज उदास यांची 5 लोकप्रिय गाणी आज आम्ही सांगणार आहोत.

चिट्ठी आई है (Chitthi Aayi Hai)

चांदी जैसा रंग है तेरा (Chandi Jaisa Rang Hai Tera)

चुपके चुपके (Chupke Chupke)

ना कजरे की धार (Na Kajre Ki Dhar)

जीए तो जीए कैसे (Jeeye To Jeeye Kaise)

Mother's Day 2019 Special Songs: 'आई' चे महत्त्व पटवून देणारी मराठी आणि हिंदी सिनेमातील 8 हळवी गाणी

गायक पंकज उदास यांना 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. त्यांना न केवळ देशात पुरस्कार मिळाले, तर विदेशातही त्यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक बॉलिवूड गाण्यांसह गजल सुद्धा गायिली. त्यांच्या सदाबहार गजलींनी त्यांना विशेष अशी ओळख निर्माण करुनही. अशा या लोकप्रिय, लाडक्या गोड आवाजाच्या गायकाला लेटेस्टली कडून वाढदिवसाच्या खूप सा-या शुभेच्छा...