आपल्या कॅामेडीवर भारचीय चाहत्यानां हसवणारा कपिल शर्माच्या (Kapil Sharma) आयुष्यावर लवकरच बायोपिक (Biopic) चित्रपट बनणार आहे. सध्या 'फुक्रे 3' (Fukrey 3) वर काम करत असलेले दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा (Mrigdeep Singh Lamba) यांनी शुक्रवारी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मावर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे. ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाचे नाव 'फनकार' असे असेल. निर्माता महावीर जैन यांनी जाहीर केले की हा चित्रपट कॉमेडी किंगच्या जीवनावर आधारित असेल आणि त्याची निर्मिती लायका प्रॉडक्शन अंतर्गत केली जाईल. कपिल शर्माला परिचयाची गरज नाही. तो बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याचा शो 'द कपिल शर्मा शो' खूप लोकप्रिय आहे आणि गेल्या वर्षी त्याने त्याच्या नवीन सीझनसह पुनरागमन केले.
कपिल शर्माच्या बायोपिकची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती पण कोणत्याही प्रकारची पुष्टी केलेली बातमी समोर येत नव्हती पण आता कपिल शर्माचा बायोपिक बनणार आहे हे पूर्णपणे कन्फर्म झाले आहे. या चित्रपटाच्या आगमनानंतर प्रेक्षकांना कपिल शर्माचे आणखी एक नवीन रूप पाहायला मिळणार आहे. कपिल शर्माच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून दाखवला जाण्याची शक्यता आहे. (हे ही वाचा Kapil Sharma I Am Not Done Yet: कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ)
कपिल शर्मावर बनणार बायोपिक
दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा म्हणाले, "मी भारतातील सर्वात लाडका चाहता असलेल्या कपिल शर्माची कथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी उत्सुक आहे. महावीर जैन पुढे म्हणाले, “कपिल शर्माच्या सौजन्याने कोट्यवधी लोकांना त्यांचा दैनंदिन हसण्याचा डोस मिळतो. आपल्या सर्वांना प्रेम, जीवन आणि हसण्याची गरज आहे. कॉमेडी सुपरस्टार कपिल शर्माची अनटोल्ड स्टोरी मोठ्या पडद्यावर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो
कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर
कपिल शर्माही लवकरच नेटफ्लिक्सवर येणार आहे. त्याने कपिल शर्माच्या नावाने टीझर शेअर केला आहे. तो त्याच्या आयुष्यातील काही मजेदार किस्से आणि इतर अनेक विषयांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.