Sofia Hayat Instagram Account Gets Deleted: बिग बॉस 7 फेम 'सोफिया हयात' हीचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट, पैशांसाठी धमकी; नेमकं काय प्रकरण
Sofia Hayat PC twitter

Sofia Hayat Instagram Account Gets Deleted: अभिनेत्री आणि बिग बॉस 7 फेम सोफिया हयात हिनं नुकतच तीचं इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यात आल्याचं उघड केले आहे. अकाउंट डिलीट करण्याआधी तीला अनेकदा चेतावणी येत होती. अकाउंट पुन्हा मिळवण्यासाठी तीला पैशांसाठी धमकी येत होती. यावर सोफियाने तीचे अकाउंट का डिलीट झाले हे माध्यमांना सांगितले आहे.  ETimes वृत्तपत्राशी संवाद साधताना तिने सांगितले की, कंटेट काढून टाकण्याबद्दल Instagram कडून अनेक चेतावणी देण्यात आली. तिच्या खात्याला लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी बॉट्सचा वापर केला गेला.

सोफिया हयात म्हणाली की, एका महिन्यापूर्वी मला इंस्टाग्रामवर कोणीतरी मेसेज केला होता. ज्यामध्ये असं लिहले होते की, माझ्या अकाउंटबद्दल अनेक तक्रारी करण्यासाठी कोणीतरी बॉटला पैसे दिले आहेत. यावरून समोरून मेसेज आला की, हे थांबवू शकतो. यानंतर तीने सांगितले की, तीच्या कंटेटने कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले नाही. यावर सोफियाने इन्स्टाग्राम टीमशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ते होऊ शकले नाही. त्यानंतर सोफिया हयात अकाउंटवर बॉट्स हल्ल्याविषयी मेसेज आला. हे थांबवण्यासाठी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.

सोफिया पुढे म्हणाली की, मला बॉट्स काय आहे हे माहित नव्हते, त्यामुळे Google वर याबद्दल माहिती शोधली. मग कळले की, बरेच लोक आहेत जे इंस्टाग्राम बंद करण्यासाठी पैशाच्या बदल्याच बॉट्स वापरतात. त्याचे अकाउंट डिलीट केल्याने त्याच्या फॉलोअर्सशी संपर्क तुटतोच. जुना डेटाही डिलीट होतो. तीचा अकाउंट डिलीट झाल्यानंतर ती दु:ख व्यक्त केले आहे. आपले जुने अकाउंट डिलीट केल्यानंतर तीने तिचे नवीन इंस्टाग्राम हँडलही सुरू केले आहे अशी माहिती ट्वीटरवरून दिली.