Bigg Boss 17: प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) टेलिव्हिजनवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. शोचा भव्य प्रीमियर आजपासून सुरू होत आहे. स्पर्धकांना 105 दिवस घरात ठेवले जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळी अशा अनेक गोष्टी घडतील, ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. या शोमध्ये काही जोडपे आणि काही एकटेच सहभागी होतील असे आधीच सांगण्यात आले आहे. पण यासोबतच आणखी अनेक गोष्टी घडतील ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. यावेळच्या शोच्या संकल्पनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.
'बिग बॉस 17' रविवार 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. निर्मात्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा स्पर्धकांचे व्हिडिओ जारी केले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची छोटीशी झलक दाखवताच सर्व स्पर्धकांना पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. याशिवाय ज्या घरात स्पर्धकांना ठेवण्यात येणार आहे त्या घरात पाच मोठे बदल करण्यात आले आहेत. म्हणजेच या शोमध्ये प्रेक्षकांना अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. (हेही वाचा -Kaala Paani Web Series Trailer: अंगाला काटा आणणारा 'काला पानी' वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज, लवकर प्रेक्षकांच्या भेटीला)
प्राप्त माहितीनुसार, घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची मूर्ती ठेवण्यात आली आहे. याशिवाय घरातील स्वयंपाकघर युरोपियन थीमवर बनवण्यात आले आहे. बिग बॉस 17 चे किचन एरिया कॅफेसारखे आहे.
Bigg Boss 17 Enterance - Every season Trophy look pic.twitter.com/9uYzGRAsQ0
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) October 14, 2023
मोबाईल वापरण्याची परवानगी -
यावेळी स्पर्धकांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या नियमात एक ट्विस्ट आहे. सर्व स्पर्धकांना फोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. ही सुवर्णसंधी त्यांनाच मिळेल जे दिलेले काम पूर्ण करू शकतील. आणखी एका बदलांतर्गत जोडप्यांना हार्ट थीम असलेली खोली दिली जाईल, ज्यामध्ये लक्झरी वस्तू असतील. ज्यांना चाहते त्यांचे आवडते म्हणून घोषित करतील त्यांना ब्रेन सेक्शनची थीम असलेली खोली दिली जाईल.
अनेक स्पर्धकांमध्ये, प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा चोप्रा देखील सलमान खानच्या शोचा एक भाग असेल. 'बिग बॉस 17' रविवार 15 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजता सुरू होत आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता दाखवला जाईल.