Aditya Narayan On Financial Crisis: लॉकडाऊन दरम्यान गायक 'आदित्य नारायण'वर मोठे आर्थिक संकट; खात्यात फक्त 18,000 शिल्लक असल्याची माहिती
Aditya Narayan (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या आजारामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा त्रास सर्वांनाच झाला आहे. या लॉकडाऊनमुळे फक्त सामान्य लोकांचीच आर्थिक परिस्थिती (Financial Crisis) बिघडली नाही, तर बऱ्याच दिग्गज लोकांनाही याचा फटका बाला आहे. मनोरंजात विश्वात लॉकडाऊन दरम्यान छोट्या पडद्यावरील कलाकारांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. शूटिंग थांबल्यामुळे त्यांचे काम बंद झाले अशात बरेच लोक अजूनही बेरोजगारीशी झगडत आहेत. आता यामध्ये अजून एक लोकप्रिय नाव पुढे आले आहे, ते म्हणजे गायक आणि टीव्ही शो होस्ट आदित्य नारायण (Aditya Narayan).

बॉलिवूडमधील दिग्गज प्लेबॅक गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आजकाल मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करीत आहे. ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत आदित्य नारायणने सांगितले की, सध्या परिस्थितीमुळे त्याच्या सर्व योजना लोकामाडून पडल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे लॉक डाऊन. आपल्याला एक वर्ष काम मिळणार नाही असा विचार त्याने अजिबात केला नव्हता. मात्र आता वस्तुस्थिती अशी आहे की, या दरम्यान काम नसल्यामुळे त्याची सर्व बचत संपली आहे.

आदित्यने पुढे सांगितले, लॉकडाऊन दरम्यान त्याने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवलेला पैसा काढला. आता त्याच्या खात्यामध्ये केवळ 18,000 रुपये शिल्लक आहेत आणि जर ऑक्टोबरपर्यंत त्याला काम मिळाले नाही तर त्याला त्याची बाईकदेखील विकावी लागेल. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेता Vivek Oberoi च्या मुंबई तील घरी पोलिसांचा छापा; Sandalwood Drug Case मधील संशयित आरोपी विवेकच्या नात्यात!)

दरम्यान, आदित्यने नुकतेच अधिकृतरित्या आपली लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत लग्न करण्याची घोषणा केली आहे. आदित्य नारायणने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या अंतापर्यंत तो आणि श्वेता विवाहबंधनात अडकू शकतात. आदित्य 2020 मध्ये 'शापित' चित्रपटावेळी श्वेताला भेटला आणि तेव्हापासून ते दोघे एकत्र होते.