सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा बघायला मिळत आहे, तो म्हणचे नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित "झुंड" (Jhund) चित्रपटाची. हा चित्रपट 4 मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सोशल मीडियावरही (Social Media) चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भुमिका आहे. तर सैराट फेम आर्ची आणि परश्या ही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी ‘झुंड’ या चित्रपटातील आपले मानधन कमी केल्याचे वृत्त आहे. सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे (Vijay Barse) यांच्या जीवनावर आणि घटनांवर आधारित आहे. 'झुंड'मध्ये अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत, जे वंचित मुलांच्या गटाला फुटबॉलपटू बनवण्याच्या प्रयत्नात आहे.
चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी केला खुलासा
चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रेक्षकांना भावूक करत असतानाच चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी खुलासा केला की, अमिताभ बच्चन यांचा चित्रपटावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे चित्रपटाला अडचणी येऊ लागल्यावर बिग बींनी त्यांचे मानधन कमी करण्याची ऑफर दिली. निर्मात्याने सांगितले की, दिग्गज अभिनेत्याच्या टीमनेही बिग बींच्या पावलावर पाऊल टाकले आणि त्यांचे मानधन कमी केले.
View this post on Instagram
माझ्यावर खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर खर्च करा
'मिड-डे'शी बोलताना ते म्हणाले- 'बच्चन सरांना ही स्क्रिप्ट खूप आवडली. माफक बजेट असलेल्या चित्रपटात त्यांना कसं कास्ट करायचं याचा विचार करत असताना त्यांनी त्याचे मानधन कमी करून त्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. माझ्यावर खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर खर्च करा, असे ते म्हणाले. (हे ही वाचा Adipurush: महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित)
या चित्रपटात अनेक अडथळे असल्याचेही निर्मात्याने उघड केले. 2018 मध्ये दिग्दर्शक मंजुळे यांनी या चित्रपटासाठी पुण्यात सेट बांधला होता, पण पैशांच्या कमतरतेमुळे तो काढावा लागला होता. T-Series येऊन प्रकल्पाला पाठिंबा देण्यापूर्वी हा प्रकल्प वर्षभरापासून रखडला होता. सिंग म्हणतात, "आम्ही चित्रपटाचे शूटिंग नागपुरात केले, भूषण कुमार यांचे आभार, ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला."