Coronavirus बाबत जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन यांंची खास भोजपुरी कविता (Watch Video)
Amitabh Bachchan (Photo Credits: Twitter)

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. आता WHO ने त्याला जागतिक आरोग्य संकट जाहीर केल्याने आता भारतामध्येही त्याची भीती वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हात स्वच्छ धुणं, शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल ठेवणं असे खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. मात्र आता बॉलिवूडचे बीग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या खास अंदाजामध्ये कोरोनाशी सामना करण्यासाठी कशी काळजी घ्यावी यासाठी खास कवितेच्या माध्यमातून जनजागृती साठी पाऊल उचलले आहे. मजेशीर अंदाजातील कविता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून शेअर केलं आहे. Coronavirus Outbreak: मुंबईतील शाळांना UNICEF यांच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन.

भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरसचे रूग्ण 70 च्या वर पोहचले आहेत तर जगभरात लाखभर लोकं कोरोनाग्रस्त असून मृतांचा आकडा 4000 च्या वर पोहचला आहे. अशामध्ये आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशातील नागरिकांनी पर्यटकांवर बंदी घातली आहे. अमेरिकेने 30 मार्च पर्यंत युरोपातून येणार्‍या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. तर भारतामध्येही 15 एप्रिलपर्यंत व्हिसा रद्द करण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांचं ट्वीट

अमिताभ बच्चन यांच्या भोजपुरी कवितेमध्ये त्यांनी कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी बाळगताना काय करावं, काय करू नये? याचे घरगुती उपाय सांगितले आहेत. सध्या कोरोना या व्हायरचं नाव ऐकूनच अनेकांच्या मनात धस्स होतं. मात्र आता बीग बी यांनी त्यावर हलकी फुलकी कविता करून अनेकांचं टेन्शन थोडं हलकं केलं आहे. सध्या सरकारदेखील समजात जनजागृतीची मोहिब राबवताना विविध मार्गांचा वापर करून नागरिकांना घाबरून जाऊ नका पण काळजी घ्या असं आवाहन करत आहे.