Coronavirus (Photo Credits: PTI)

कोरोना व्हारसचा भारतात सुद्धा प्रवेश झाल्याने त्याचा आकडा 60 पेक्षा अधिक झाल आहे. तर महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झाल्याची 11 प्रकरणे समोर आली आहे. त्यापैकी 8 पुण्यात 1 मुंबई आणि 1 नागपूर येथील आहे. याच कारणास्तव आता मुंबईतील शाळांना UNICEF यांच्या सुचनांचे आवाहन करण्यात आले आहे. तर टाईम्स ऑफ इंडिया यांच्या मते, UNICEF यांनी शाळांनी सकाळीच्या वेळी एकत्र जमणे, खेळाचे कार्यक्रम किंवा अन्य गोष्टींसाठी गर्दी करणारे जे काही उपक्रम आहेत ते रद्द करण्यास सांगितले आहे.

शाळांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्याच्या पासून दूर रहा पण त्यांच्याशी वेगळे वागू नका. अशा मुळे कोरोना संक्रामित व्यक्ती या आजाराशी सामना करण्याचे मनोबल हरवून जाऊ शकते असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबईत कोरोना व्हायरसचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. तसेच कोरोनामुळे गरज वाटल्यास शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली जाईल असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तर कोरोना व्हायरस म्हणजे एक विशिष्ट प्रदेश किंवा खंडप्राय देशांमध्ये उद्भवणारा साथीचा आजार असल्याचे म्हटले आहे.(Coronavirus: COVID-19 विषाणू म्हणजे साथीचा आजार- जागतिक आरोग्य संघटना)

महाराष्ट्रासोबतच राजधानी दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि राजस्थान राज्यांमध्येही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारे यांनीही आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून कोरोना व्हायरची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या शक्य तितक्या सर्व नागरिकांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष विभाग सुरु करण्यात आले आहेत. गरज पडल्यास खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली जाणार आहे.