Bhonsle Trailer: मनोज वाजपेयी यांचा पहिल्यांदाच मराठमोळा अंदाज दाखवणारा 'भोसले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; मराठी अभिनेता संतोष जुवेकर देखील साकारणार महत्वाची भूमिका
Bhonsle Trailer (Photo Credits: YouTube)

देवाशीष मखीजा दिग्दर्शित 'भोसले' (Bhonsle) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) भोसले या पोलिस हवालदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. मनोज वाजपेयी ही प्रमुख भूमिका असून मराठी कलाकार संतोष जुवेकर (Santosh Juvekar) देखील महत्वाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाने याआधीच 20 व्या मामि फिल्म फेस्टिवलमध्ये झळकून अनेकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. जातीय भेदभाव विषयावर आधारित या चित्रपटात जातीय द्वेषाच्या विरोधात उभे असलेले एक मराठी कॉन्स्टेबल भोसले यांची कथा मांडण्यात आली आहे.

संतोष जुवेकर याने या चित्रपटात विलास हे पात्र साकारले आहे. तर अभिषेक बॅनर्जी याने उत्तर भारतीय माणसाची भूमिका साकारली आहे. लॉकडाऊन मुळे हा चित्रपट ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रजर्शित केला जाणार आहे. 25 वर्ष काम केल्यावरही मला outsider सारखं वाटतं; Manoj Bajpayee चा खुलासा

पाहूया 'भोसले' चित्रपटाचा दमदार ट्रेलर

भोसले हा चित्रपट येत्या 26 जूनला Sony Liv वर प्रदर्शित होणार आहे. मनोज वाजपेयी सह संतोष जुवेकर, अभिषेक बॅनर्जी, इपशिता चक्रबोर्ती, विराट वैभव, नीतू पांडे हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतील.