भोजपुरी अभिनेत्री Monalisa ने जान्हवी कपूरच्या Nadiyon Paar गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पहा व्हिडिओ
Monalisa Dance Video on Nadiyon Paar Song (PC - Instagram)

Monalisa Dance Video: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांसाठी दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. मोनालिसाने नुकताचं आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिमध्ये मोनालिसा बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'रूही' (Roohi) चित्रपटातील 'नदियों पार' (Nadiyon Paar) गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसली आहे. या गाण्यात मोनालिसाचा अंदाज पाहण्यासारखा आहे. यात तिच्यासोबत आणखी एक तरुणी डान्स करताना दिसत आहे. या दोघींनी नदियों पार गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मोनालिसाचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये मोनालिसाने पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला असून या ती खूपचं सुंदर दिसत आहे. आतापर्यंत हजारो चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेक लाईक्स तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत. मोनालिसाचा हा जबरदस्त डान्स पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. (वाचा - Janhvi Kapoor ने जिम वर्कआउट करताना गायल 'शीला की जवानी' गाणं; पहा खास व्हिडिओ)

मोनालिसा नेहमी आपले फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंवर कमेंट्स करताना तिचे चाहते कधीचं थकत नाहीत. मोनालिसाने 'मनी है तो हनी है', 'सरकार राज', 'गंगा पुत्र' आणि 'काफिला' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. भोजपुरी चित्रपटांमधील सुपरस्टार्सच्या यादीत मोनालिसाचे नाव आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने आतापर्यंत लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONNALLISA (@aslimonalisa)

विशेष म्हणजे मोनालिसाने हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. इतकेचं नाही तर मोनालिसाची गणना टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. मोनालिसाचे खरे नाव अंतरा विश्वास आहे. तिने बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोमधून टीव्ही शोमध्ये प्रवेश केला होता.