Janhvi Kapoor ने जिम वर्कआउट करताना गायल 'शीला की जवानी' गाणं; पहा खास व्हिडिओ
जान्हवी कपूर (Image Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. जेव्हा जेव्हा ती सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर करते, तेव्हा चाहते तिच्या अंदाजाने घायाळ होतात. जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये सुटी घालवत आहे. जिथे ती आपल्या मित्रांसह वेळ घालवत आहे. जान्हवी कपूरने मालदीवमधील बरेच व्हिडिओज आणि फोटो शेअर केले आहेत. अशातचं अभिनेत्रीने आता जिममधील एक अतिशय रंजक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा लूक पाहण्यासारखा आहे.

जान्हवी कपूरने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वर्कआउट करताना दिसली आहे. वर्कआउट दरम्यान जान्हवी 'शीला की जवानी' हे गाणं गाताना दिसत आहे. यात जान्हवीची स्टाईल पाहण्यासारखी आहे. स्वत: ला प्रेरित करण्यासाठी जान्हवी हे गाणं गात असल्याचं दिसून येत आहे. (वाचा - सुप्रसिद्ध गायिका Shreya Ghoshal ने कोरोना काळात अशा पद्धतीने साजरे केले आपले डोहाळे जेवण)

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Purohit (@namratapurohit)

दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जान्हवी कपूर करण जोहरच्या 'दोस्ताना 2' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर सोबत कार्तिक आर्यन आणि लक्ष्यही दिसणार आहेत. नुकत्याचं रिलीज झालेल्या जान्हवीच्या रुही चित्रपटाने चाहत्यांना प्रभावित केलं आहे. या भयपट विनोदी चित्रपटात राजकुमार राव आणि वरुण शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.