Bharat Ko Salaam New Bharat Poster: अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) दिग्दर्शित सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) यांचा आगामी सिनेमा 'भारत'(Bharat) सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. सलमान खानचा 'पेपर अॅन्ड सॉल्ट' लूक, 'यंग लूक' नंतर आता सलमान आणि कॅटरिनाचा एकत्र फोटो असलेले पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या लूकचं नवं पोस्टर सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यावर सोशल मीडियामध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. Bharat New Poster: सलमान खान आणि कतरिना कैफ यांची झलक असलेले 'भारत' सिनेमाचे नवे पोस्टर आऊट
सलमान खानचा नवा लूक
Meri Mitti. Mera Desh!🙏🏼#BharatKoSalaam @Bharat_TheFilm @aliabbaszafar @atulreellife @itsBhushanKumar #KatrinaKaif #Tabu @bindasbhidu @DishPatani @WhoSunilGrover @sonalikulkarni @norafatehi @iaasifsheikh @nikhilnamit @reellifeprodn @SKFilmsOfficial @TSeries pic.twitter.com/Q2Wrain1UO
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 18, 2019
सलमान खान आज शेअर केलेल्या पोस्टरमध्ये नेव्हीच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. 'मेरी मिट्टी मेरा देश' अशा कॅप्शनसोबत हा फोटो शेअर केला आहे. सिनेमाच्या पोस्टरवर 1985 असा असा उल्लेख करण्यात आला आहे.
सलमान आणि कॅटरिनाचा 'भारत' सिनेमा यंदाच्या ईद दिवशी 5 जूनला रीलिज होणार आहे. आता सलमान आणि कॅटरिनाच्या फॅन्सला सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे.