Aindrila Sharma Passed Away: मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा (Aindrila Sharma) यांचे निधन झाले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे कोलकाता येथील रुग्णालयात उपचारादरम्यान ऐंद्रिला शर्मा यांचा मृत्यू झाला आहे. एंड्रिला शर्मा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं सांगण्यात येत आहे. एंड्रिला कोमात गेली होती आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंगही तिला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आला होता.
24 वर्षीय एंड्रिला शर्माचा रविवारी मल्टिपल कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला. रात्री 12.59 वाजता अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. Andrila शर्मा यांना 1 नोव्हेंबर 2022 रोजी ब्रेक स्ट्रोक आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होती. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग यांनी तिला मदतीचा हात पुढे केला. रिपोर्ट्सनुसार 12 लाखांहून अधिक हॉस्पिटलचा खर्च झाला आहे. (हेही वाचा - Nora Fatehi: विवाहीत पुरुषास डेट करतेय अभिनेत्री नोरा फतेही? सोशल मिडीयावर एकचं चर्चा)
View this post on Instagram
एंड्रिला शर्माने दोनदा कॅन्सरवर मात केली होती. पण हृदयविकाराच्या झटक्यामुळे ती ही लढाई जिंकू शकली नाही. इतकंच नाही तर कॅन्सरशी लढा जिंकून एंड्रिलाने पुनरागमनही केलं होतं. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी ऐकून तिचे चाहते आणि कॉस्टार्स खूप दु:खी झाले असून सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.