Bholaa: 'रनवे 34' रिलीजहोण्यापुर्वी अजयने त्याच्या नव्या प्रोजेक्टची केली घोषणा
Ajay Devgn (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) लवकरच 'रनवे 34' मध्ये दिसणार आहे, मात्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याने त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. अजयच्या नवीन चित्रपटाचे नाव 'भोला' (Bhola) आहे. हा तमिळ भाषेतील 'कैथी' चित्रपटाचा रिमेक असेल. या चित्रपटाच्या नावासोबतच या अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. अजयचा हा चित्रपट पुढील वर्षी 30 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बूची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यापूर्वी दोघे 'दे दे प्यार दे' या चित्रपटात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले होते. अजयचा हा आगामी चित्रपट अॅक्शनने परिपूर्ण असणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात तब्बूची व्यक्तिरेखा पोलीस अधिकाऱ्याची असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

या चित्रपटात तब्बू जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. धर्मेंद्र शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. धर्मेंद्र शर्मा अजय देवगणचा चुलत भाऊ आहे. याआधी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटातून ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. (हे देखील वाचा: अक्षय कुमार याने मागितली चाहत्यांची माफी, तंबाकूजन्य पदार्थांच्या जाहिराती करण्याबाबतही मोठा निर्णय)

वर्क फ्रंटवर, अजयचा आगामी चित्रपट 'रनवे 34' चित्रपट 29 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अजय व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंह देखील दिसणार आहेत. अजय देवगणने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यानंतर अजय देवगण मैदान या चित्रपटात दिसणार आहे. भुज द प्राईड ऑफ इंडिया हा मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉट स्टारवर प्रदर्शित झाला.