Akshay Kumar: अक्षय कुमार याने मागितली चाहत्यांची माफी, तंबाकूजन्य पदार्थांच्या जाहिराती करण्याबाबतही मोठा निर्णय
Akshay Kumar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याला विमल इलायची या तंबाकूजन्य उत्पादनाची (Tobacco Products) जाहिरात (Advertising) करताना आपण नक्कीच पाहिले असेल. केवळ अक्षय कुमारच नव्हे तर अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि इतरही काही अभिनेत्यांना ही जाहीरात करताना आपण पाहिले असेल. याच जाहिरातीवरुन अक्षय कुमार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला. लोकांनी प्रचंड प्रमाणावर अक्षय कुमार याच्यावर टीकेची झोड उडवली. त्यानंतर अक्षय कुमार याने एक महत्त्वाचा निर्णय घेत सोशल मीडियावर चाहत्यांची माफीही मागितली.

अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांची माफी मागत म्हटले की, मी या जाहिरातीमधून स्वत:ला मागे घेतो आहे. त्याने जाहीर केले आहे की, आता तो तंबाकूजन्य पदार्थांच्या उत्पादनाची (विमल ब्रांड) जाहीरात करणार नाही. अशा उत्पादनांचा ब्रँड अँबॅसडर होणार नाही. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमतून अक्षयने हा निर्णय आपल्या चाहत्यांना कळवला आहे. (हेही वाचा, Madhya Pradesh: कॉंग्रेसने जाळले Amitabh Bachchan आणि Akshay Kumar यांचे कटआउट; जाणून घ्या कारण)

अक्षय कुमारने आपल्या ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टा पोस्टवर म्हटले आहे की, 'मला माफ करा. माझे हितचिंतक आणि चाहते या सर्वांची मी सर्वांची माफी मागू इच्छितो. पाठिमागील काही दिवसांपासून माझ्याबद्दल आलेल्या प्रतिक्रियांनी मला विचार करण्यास भाग पाडले. मी कधीही तंबाकुजन्य पदार्थांचे सेवन केले नाही. करणार नाही. विमल इलायचीसोबत असलेल्या माझ्या असोसिएशनवरुन काही गोष्टी पुढे आल्या. आपल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे विनम्रतापूर्व मी स्वत:ला या जाहिरातींपासून वेगळे करतो'.

ट्विट

अक्षय कुमराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, 'मी निर्णय घेतला आहे की, या जाहिरातीतून आलेले पैसे मी एखाद्या चांगल्या कामासाी वापरेण. ब्रांडला वाटले तर कराराचा अवधी पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात तो प्रसिद्ध करु शकतो. परंतू मी वचन देतो की, भविष्यात मी मोठ्या विचारपूर्वक पर्याय निवडेन. आपल्या प्रेमासाठी मी सतत आशीर्वाद मागत राहीन.'