Batla House 'O Saki Saki' Song: नोरा फतेही च्या मादक अदांनी घायाळ करणारं बाटला हाऊस मधील 'ओ साकी साकी' गाणं तुम्ही पाहिलं का?
Nora Fatehi O Saki Song (Photo Credits: YouTube)

निखिल अडवाणी (Nikhil Advani) दिग्दर्शित 'बाटला हाऊस' (Batla House) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम (John Abraham) पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली असून सध्या हा चित्रपट चर्चेत आलाय तो या चित्रपटातील गाण्यामुळे. 'दिलबर' गाण्याने अवघ्या तरुणाईला वेडं लावणारी नोरा फतेही (Nora Fatehi) पुन्हा एकदा एका रिमेक गाण्यावर ताल धरताना दिसतेय. 'ओ साकी साकी' (O Saki Saki) असे या गाण्याचे नाव असून 2011 प्रदर्शित झालेल्या मुसाफिर चित्रपटातील गाण्याचे रिमेक आहे. अभिनेत्री कोएना मित्रा (Koena Mitra) वर हे गाणे चित्रीत करण्यात आले होते.

या रिमेक गाण्यामधील नोरा च्या अदांनी तिच्या चाहत्यांनी घायाळ केले असून युट्यूबवर गाणे प्रदर्शित होताच काही तासांतच लाखों च्या वर लोकांनी हे गाणे पाहिले आहे.

हे गाणे नेहा कक्कड (Neha Kakkar) आणि तुलसी कुमार (Tulsi Kumar) यांनी गायलिले असून तनिष्क बाग्ची या गाण्याचे गीतकार आहेत. विशाल शेखर यांनी या गाण्याला संगीत दिले असून नोरा च्या मादक अदांनी हे गाणे आणखीनच खुलले आहे.

हेही वाचा- Turpeya Song: सलमान खान याच्या 'भारत' सिनेमातील Turpeya गाण्यात नोरा फतेही हिच्या हॉटनेसचा तडका (Watch Video)

या चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारित आहे. 2008 मध्ये दिल्लीतील जामियानगरमध्ये बाटला हाऊसमधील इंडियन मुजाहिदीनच्या चार अतिरेक्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती. जॉन अब्राहम या सिनेमात डीसीपी संजीव कुमार यादव यांची भूमिका साकारत आहे. 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.