Badla trailer OUT: 'बदला' घेण्यासाठी तापसी पन्नू तयार, अमिताभ बच्चन आपला विक्रम मोडणार का याबाबत उत्सुकता
Badla Trailer (Photo Credits: YouTube)

Amitabh Bachchan and Taapsee Pannu starrer Badla trailer out, Watch video: बॉलिवुड अभिनेता बीग बी बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) यांचा आगामी 'बदला' (Badla Movie) या चित्रपटाचा ट्रेलर (Badla Trailer) आज (मंगळवार, 12 फेब्रुवारी) लॉन्च झाला. सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत जोरदार उत्सुकता होती. आता तर ट्रेलरही लॉन्च झाला आहे. ट्रेलर पाहूनही ही उत्सुकता अशीच कायम राहताना दिसते. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्हीही पाहू शकता. त्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.

ट्रेलर पाहून लक्षात येते की हा एक थ्रिलर चित्रपट आहे. तापसी पन्नू एका खून प्रकरणात अडकली आहे. या प्रकरणात अमिताभ बच्चन तापसी पन्नू हिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करताना दिसतात. बदला हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर आहे. ट्रेलर पाहून तर तसे वाटते. चित्रपटाचा ट्रेलर पाहून बच्चन यांच्या पिंक या चित्रपटाचीही आठवण येते. कारण, यातही अमिताभ बच्चन वकिलाच्या भूमिकेत दिसतात. तापसी पन्नू हिचा अभिनय पाहूनही असे वाटते की, तीही दमदार भूमिका साकरते आहे.

दरम्यान, अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांनी 11 फेब्रुवारी रोजी बदला चित्रपटाचे पोस्टर रिलिज केले होते. या चित्रपटात अमिताभ हे अशा वकिलाची भूमिका साकारत आहेत. जो गेली चाळीस वर्षे एकही केस हारला नाही. ट्रेलर रिलिज होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ट्रेलर रिलिज होण्यापूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'बदला गुप्ता गेली 40 वर्षे एकही केस हारला नाही. कोणताही बदला माझे हे रोकॉर्ड बदलू शकत नाही.' आता चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे की, अमिताभ यांचे हे रेकॉर्ड मोडले जाते की नाही. (हेही वाचा, व्हिडिओ: रितेश देशमुख याच्या Total Dhamaal चित्रपट ट्रेलरचे हे मराठी Spoof पाहिले काय?)

अमिताभ आणि तापसी यापूर्वी पिंक चित्रपटातून एकत्र आले होते. या चित्रपटाचे बरेच कौतुक झाले होते. आता हे दोखे दुसऱ्यांदा एकत्र येताना दिसत आहेत. बदाल चित्रपट येत्या 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.