व्हिडिओ: रितेश देशमुख याच्या Total Dhamaal चित्रपट ट्रेलरचे हे मराठी Spoof पाहिले काय?
Total Dhamaal Movie Trailer Spoof in Marathi | (Photo credit: archived, edited, representative image)

Total Dhamaal Movie Trailer Spoof in Marathi: बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgn), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), माधुरी दिक्षित (Madhuri Dixit), यांचा आगामी चित्रपट 'टोटल धमाल' (Total Dhamaal)प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणार असे दिसते. किमान या चित्रपटाचा लॉन्च झालेला कॉमेडी ट्रेलर आणि एकमद फनी Spoof पाहून तर तसे वाटते खरे. Total Dhamaal चित्रपटाचे Trailer Spoof Marathi युट्यूबवर सोमवारी (11 फेब्रुवारी) शेअर करण्यात आले. Spoofमधील कलाकारांच्या अदा आणि प्रत्येक डायलॉग हसू आणणारा आहे. यात मराठी भाषेचा मोठ्या खुबीने वापर करण्यात आला असून, त्याला पुणेरी टच द्यायचाही प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, Spoofमध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि त्यापेक्षा काही संवाद पाहता हे Spoof ठरावीक चौकटीत आडकल्याचेही पाहायला मिळते.

दरम्यान, Spoofमध्ये वापरण्यात आलेले डायलॉक मनोरंजन करण्यात बऱ्यपैकी यशस्वी झाले आहेत. अर्थात चितळेंच्या भारकरवडीला Spoofमध्ये काहीसा अधिक भाव देण्यात आला आहे. त्यामुळे कॉमेडी अस्सल पुणेरी होऊन जाते. जसे की, 'मी तुम्हाला चितळेंच्या भाकरवडीची रेसीपी सांगेण', 'भाकरवडीच काय आळुवडीही देणार नाही.' यांसारखे संवाद. FoxStarHindi या युट्यूब चॅनलवर हे स्फूफ अपलोड करण्यात आले आहे. (हेही वाचा, Total Dhamaal Trailer: 'टोटल धमाल'चा धमाकेदार ट्रेलर, 17 वर्षांनी अनिल कपूर - माधुरी दीक्षित एकत्र)

Spoofमध्ये सर्वात मजा आणतोय तो हेलिकॉप्टरवाला सीन. अभिनेता जॉनी लीवर (Johnny Lever), रितेश देशमुख आणि आणखी एकजण अत्यंत जुनाट अशा खटारा हेलिकॉप्टरमध्ये बसलेले आहेत. काही केल्या हेलिकॉप्टर सुरु होत नाही. रितेश जॉनीला म्हणतो 'ढकलाना दादा' यावर जॉनी म्हणतो 'हा आटोस्टार्ट आहे. पूर्वी टमटम होता आणता त्याला पंखा लाऊन हेलिकॉप्टर केला.' असे काही सीन फार मजेशीर आहेत. अर्थात या साधाराण अडीच मिनिटांच्या (2.44) Spoofमध्ये बरेच काही मनोरंजन करणारे आहे. जे तुम्हाला व्हिडिओ प्ले करुनच पाहावे लागणार आहे. Total Dhamaal चित्रपटाची चर्चा तर जोरात रंगलीय. पण प्रत्यक्षात प्रेक्षक मात्र त्याला कसा प्रतिसाद देतात हे लवकरच कळणा आहे.