Dream Girl 2 new poster (Photo Credit: Instagram)

Ayushmann Khurrana's Dream Girl 2 News: आयुष्मान खुराना अभिनीत ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपट प्रदर्शीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास स्थगिती देण्याची याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अंतिम क्षणी चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखता येणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे हा चित्रपट नियोजित वेळ आणि तारखेनुसार येत्या शुक्रवारी (25 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे चाहते आणि सिनेरसिकांनी प्रदर्शनापूर्वीच तिकीट बुकींग मोठ्या प्रमाणाव केले आहे. त्यामुळे चित्रपटास तिकीट बारीवर चांगलाच गल्ला मिळेल असा सिनेवर्तुळात कयास लावला जात आहे.

न्यायमूर्ती रियाज छगला यांच्या एकल खंडपीठाने आशिम बागची द्वारा दाखल याचिकेतील मागणी फेटाळून लावली. या याचिकेवर 22 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्याने याचिकेत दावा केला होता की, ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे कथानक त्या पटकथेसारखे आहे जी मे 2007 मध्ये फिल्म स्क्रीन राइटर्स एसोसिएशन कडे नोंदणी करण्यात आले आहे. बागची यांनी याचिकेवर निर्णय होईपर्यंत चित्रपट प्रदर्शीत होण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. ही याचिका 18 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आली होती. त्यमुळे प्रतिवादीला उत्तर देण्यासही अवधी मिळाला नसल्याची बाजू प्रतिवादीच्या वकिलाने कोर्टात मांडली. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, हे स्पष्ट आहे की, चित्रपट प्रदर्शित होण्यापासून अंतम क्षणी रोखला जाऊ नये. अंतिम निर्णयापूर्वी प्रतिवादीला आपली भूमिका, उत्तर मांडण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणे आवश्यक आहे.

दरम्यान, याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या 31 ऑगस्ट रोजी होणार आहे. ज्यामध्ये प्रतिवादींना याचिकाकर्त्याच्या आरोपांना उत्तर द्यायचे आहे. प्रतिवादी म्हणून बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेड, कंपनीचे संचालक एकता कपूर आणि शोभा कपूर, चित्रपटाचे लेखक थिंक इंक पिक्चर्स लिमिटेडचे राज शांडिल्य आणि नरेश कथूरिया यांना आरोपांना उत्तर द्यावे लागणार आहे.

'ड्रीम गर्ल 2' मध्ये आयुष्मान खुराना यांच्यासह परेश रावल, अन्नू कपूर, राजपाल यादव, विजय राज, असरानी, अभिषेक बॅनर्जी, मनजोत सिंग आणि सीमा पाहवा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.