Sonakshi Sinha (Photo Credit: File Photo)

अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)  गेल्या काही काळापासून सोशल मीडियात अॅक्टिव्ह नव्हती. परंतु काही दिवसांपूर्वीच तिने आपले ट्वीटर अकाउंट डीअॅक्टिव्हेट केले होते. त्याचसोबत इन्स्टग्रामवरील कमेंट सेक्शन सुद्धा बंद करुन ठेवले होते. खरंतर सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सोनम कपूर, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सारा अली खान,वरुण धवन, अर्जुन कपूरसह काही स्टार किट्स यांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात येत होते. त्यात सोनाक्षी सिन्हा हिचा सुद्धा समावेश होता. सुशांतच्या प्रकरणानंतर सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियात खुप ट्रोल झाली होती. पण सोनाक्षीने सोशल मीडिया ट्रोलिंगच्या विरोधात कॅम्पेन सुद्धा चालवले होते.

इन्स्टाग्रामवरील कमेंट सेक्शन बंद केल्यानंतर सोनाक्षीने नुकतेच ते पुन्हा सुरु केले. त्यात तिने लोकांनी अपशब्द वापरु नये असे ही म्हटले होते. तरीही सुद्धा सोनाक्षी हिला निशाण्यावर धरत पुन्हा तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी अभिनेत्रीने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावर मुंबई पोलिसांनी अधिक तपास करत एका तरुणाला अटक केली आहे.(Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत च्या प्रार्थना सभेत जगभरातून 10 लाखांहून अधिक लोक झाले सामील, बहिण श्वेता सिंह किर्ति ने ट्विटरवर दिली माहिती)

दरम्यान, औरंगाबाद येथील शशिकांत जाधव याने अत्यंत वाईट शब्द वापरत अभिनेत्रीला ट्रोल केले होते. याबद्दल सोनाक्षी सिन्हा हिने 14 ऑगस्टला मुंबई सायबर गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या  प्रकरणातील तरुणाला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली आहे. तरुणाने त्याचा गुन्हा मान्य केला असून सोनाक्षीसह अन्य स्टारच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा त्याने अपशब्दांचा वापर केला होता.