Ram Mandir Consecration: आज संपूर्ण देशभरात राम मंदिराचा (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठाण सोहळा उत्साहात साजरा झाला. भव्य उत्सवादरम्यान, पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते अभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. आता प्रभू राम मंदिरात विराजमान झाले आहेत. वर्षानुवर्षे वाट पाहत असलेला क्षण आज पूर्ण झाला. या सोहळ्यात देशभरातील प्रसिद्ध लोक सहभागी झाले होते. यावेळी चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा स्वतःच्या डोळ्यांनी पाहणाऱ्या कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता राजपाल यादव यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही रामाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचनाना आणि प्रभूच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहेत. (हेही वाचा -Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी अमिताभ बच्चन, कतरिना-विकी कौशल रवाना; आलिया-रणबीरच्या लूकने वेधले लक्ष, Watch Video)
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत खूपच उत्साहित दिसत होती. अभिनेत्रीने आपले दोन्ही हात हवेत हलवले आणि जय श्री रामचा जयघोष केला. अभिनेत्रीचा उत्साह स्पष्ट दिसत होता. कंगना राणौतचा हा व्हिडिओ राम लल्लाच्या अभिषेकनंतर प्रेक्षक गॅलरीतून समोर आला आहे. अभिनेत्रीने केशरी आणि क्रीम रंगाची साडी नेसली होती.
पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
याशिवाय, अभिनेता-कॉमेडियन राजपाल यादवही खूप उत्साही दिसत होता. मात्र, अभिनेता अयोध्येला पोहोचू शकला नाही. सध्या तो हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये आहे. यावेळी त्याने शिमल्याच्या रस्त्यावर जल्लोष केला. व्हिडिओमध्ये अभिनेता खूप उत्साही दिसत होता. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हातात राम नावाचा झेंडा घेऊन नाचताना दिसत आहे.
व्हिडिओ पहा -
View this post on Instagram
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक स्टार्संनी हजेरी लावली. आलिया भट्ट, कतरिना कैफ ते रणबीर कपूर, विकी कौशल, रोहित शेट्टी आदींनी प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी सकाळी अयोध्या गाठली. या कार्यक्रमाला माधुरी दिक्षित पती श्रीराम नेने यांच्यासह पोहोचली. त्यांच्याशिवाय राजकुमार हिरानी, राम चरण, मधुर भांडारकर यांसारखे स्टार्संही यात सहभागी झाले. याशिवाय अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि चिरंजीवी यांसारखे दिग्गज स्टार्सही कार्यक्रमात पोहोचले. यावेळी सोनू निगम, अनुराधा पौडवाल आणि शंकर महादेवन यांनीही विशेष परफॉर्मन्स दिला.