अर्जुन रामपाल याने शेअर केली बाळाची पहिली झलक; भावूक पोस्टसह मुलाच्या नावाचाही खुलासा (Photo)
Arjun Rampal and Gabriella Demetriades (Photo Credits : IANS)

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) यांना 18 जुलै रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला. आता अर्जुन रामपाल याने आपल्या चिमुकल्याची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करुन मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे. या लव्हबर्ड्सने अरिक (Arik) असे आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे. (Exclusive: अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा झाला पिता, गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रिएड्स ने दिला गोंडस मुलाला जन्म)

आपल्या चिमुकल्याची पहिली झलक शेअर करताना अर्जुनने लिहिले की, "अश्रू, आनंद, आभार आणि प्रकाशाने बनलेली एक मौल्यवान गोष्ट. आमच्या आयुष्यात इंद्रधनुष्य आले आहे. आम्ही खूप खूश आणि आभारी आहोत. ज्युनिअर रामपाल, आमच्या आयुष्यात तुझे स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि  प्रेमाबद्दल धन्यवाद. बेबी अरिक रामपालला हॅलो बोला."

अर्जुन रामपाल याची पोस्ट:

'द फाइनल कॉल' या वेबसिरीजमधून अर्जुन रामपाल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर 2018 मध्ये आलेल्या 'पलटन' सिनेमातही तो झळकला होता. सोनू सूद, हर्षवर्धन राणे आणि जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. जेपी दत्ता दिग्दर्शित या सिनेमाकडे प्रेक्षकांनी मात्र पाठ फिरवली.

1998 मध्ये अर्जुनने मॉडेल मेहर जेसिया हिच्यासोबत विवाह झाला होता. या दोघांना माहिका आणि मायरा या दोन मुली देखील आहेत. मात्र कालांतराने दोघांनीही विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याचे साऊथ आफ्रिकेची मॉडेल गैब्रिएला हिच्याशी प्रेमसंबंध जुळले.