Exclusive: अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा झाला पिता, गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रिएड्स ने दिला गोंडस मुलाला जन्म
Arjun Rampal with pregnant girlfriend Gabriella Demetriades (Photo Credits: Yogen Shah)

अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रिएड्स हे बॉलिवूडमधील एक चर्चित कपल मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून गैब्रिएलाच्या प्रेग्नंसीमुळे या चर्चेत अजूनच भर पडली. काल अर्जुन रामपाल, गैब्रिएला आणि त्यांचे पालक मुंबईस्थित हिंदुजा हॉस्पिटलजवळ दिसले होते. यावरून लवकरच गैब्रिएला गोड बातमी देईल असे अंदाज बांधले गेले होते. बघता बघता ही बातमी आलीदेखील, गैब्रिएलाने एका गोंडस मुलाला (Baby Boy) जन्म दिला आहे. अशाप्रकारे अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा पिता बनला आहे. काल अर्जुन रामपालच्या दोन मुलीदेखील हॉस्पिटलमध्ये पोहचल्या होत्या.

एप्रिल महिन्यात जेव्हा अर्जुन रामपाल ची गर्लफ्रेंड गैब्रिएला प्रेग्नंट आहे हे समजले, तेव्हा प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर विविध प्रसंगी अर्जुन रामपाल आणि गैब्रिएला यांना एकत्र पाहिले गेले. या काळात अर्जुन रामपाल ज्या प्रकारे गैब्रिएलाची काळजी घेत होता ते पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. काही महिन्यांपूर्वीच अर्जुन रामपालगैब्रिएलासोबत आपल्या पाली हिलच्या बंगल्यावर शिफ्ट झाला होता. सोशल मिडियावर देखील या दोघांच्या प्रेमाचे अनेक फोटोज शेअर करण्यात आले आहेत. (हेही वाचा: अर्जुन रामपाल बाबा बनणार या खुशखबरीवर पहिली पत्नी मेहर जेसियाने 'ही' दिली प्रतिक्रिया)

दरम्यान, अर्जुन रामपालने पूर्व मिस इंडिया आणि सुपर मॉडेल मेहर जेसिया हिच्याशी पहिला विवाह केला होता. या दोघांच्या महिका आणि मायरा नावाच्या दोन मुली आहेत. तर गैब्रिएला एक मॉडेल तसेच एक डिझायनर देखील आहे. तिने डिझाइन केलेले कपडे ऋतिक रोशन चा ब्रांड एचआरएक्स (HRX) च्या अंतर्गत लॉंच केले गेले आहेत. गैब्रिएलामुळेच अर्जुन आणि ऋतिक पुन्हा एकदा एकत्र आले. आता सर्वाना उत्सुकता आहे ती बाळाची एक झलक पाहण्याची, लवकरच चाहत्यांची ही इच्छाही पूर्ण होईल.