Arijit Singh ची आई Aditi Singh चे निधन, कोरोनाविरुद्धची लढाई ठरली अपयशी- रिपोर्ट्स
Arijit Singh and His Mother Aditi Singh (Photo Credits: Instagram)

Arjit Singh Mother Passed Away: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) याच्या आईचे आज निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. अरिजीतची आई अदिति सिंह (Aditi Singh) गेल्या अनेक दिवसांपासून कोविडशी झुंज देत होती. तिची कोविडविरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. अदिति सिंह या 52 वर्षांच्या होत्या. त्या गेल्या अनेक दिवसांपासून ECMO वर होत्या. अशी माहिती मिळत आहे की, त्यांचे निधन 19 मे रोजी एमएमआरआय धकौरियामध्ये झाले होते.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, अरिजीत सिंहच्या आईच्या कोरोना रिपोर्ट 17 मे रोजी निगेटिव्ह आली होती. मात्र त्यानंतर त्यांना सेरिब्रल स्ट्रोक आला आणि यातच त्यांची प्रकृती खालावली. मात्र आता अशी बातमी समोर येत आहे की, त्यांचे निधन झाले असून त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. तथापि अजूनपर्यंत तरी अरिजीतच्या टीमने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.हेदेखील वाचा- आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे च्या वडिलांचं कोविड 19 मुळे निधन

अदिति सिंह यांचा जन्म पश्चिम बंगालच्या जियागंज येथे झाला. त्या बंगाली होत्या. तर अरिजीत सिंह यांचे वडिल शीख होते. अरिजीत सिंह च्या आईच्या निधनाची बातमी ऐकून त्याचे चाहते प्रचंड दु:खी आहे. अरिजीतचे चाहते सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याच्या आईला श्रद्धांजली व्यक्त करत आहे.

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अक्षय कुमार, आमिर खान, कार्तिक आर्यन, आलिया भट, दिपिका पादुकोण, रणबीर कपूर, मिलिंद सोमण, आर माधवन, सोनू सूद, आशुतोष राणा यांसारख्या अनेकांचा समावेश आहे.