मलायका अरोरा-अर्जुन कपूर यांच्या विवाहाच्या चर्चेवरुन अरबाज खान ह्याने दिली हास्यात्मक प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल
मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि अरबाज खान (फोटो सौजन्य-File Image)

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor)  यांच्या नात्याबद्दल प्रत्येकालाच माहित झाले आहे. तर येत्या 19 एप्रिल रोजी मलायका- अर्जुन विवाह करणार असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.परंतु अद्याप या गोष्टीबाबत दोघांकडून अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. मलायका हिचा यापूर्वीचा नवरा अरबाज खान (Arbaaz Khan)  याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अरबाज हा या दोघांच्या विवाहबद्दल हास्यात्मक प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

अरबाज ह्याला अर्जुन-मलायका ह्यांच्या विवाहबद्दल विचारले असता तो प्रथम जोर जोरात हसला. त्यानंतर असे म्हटले की, प्रश्न तर खुपच समजून घेऊन उत्तर देण्यासारखा आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर मी लवकरच देईन असे अरबाज ह्याने म्हटले आहे. (हेही वाचा-अर्जुन कपूर सोबत लग्नाच्या चर्चेवर मलायका अरोरा हिने अखेर सोडले मौन)

 

View this post on Instagram

 

Repost @lnbolly Arbaaz reaction on Arjun and Malaikas marriage

A post shared by instabollywoodfc (@lnstabollywoodfc) on

मलायका हिचा विवाह अरबाजसोबत 1998 रोजी झाला होता. परंतु नंतर या दोघांमध्ये फूट पडू लागल्याने 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट घेत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.तर असे सांगितले जात आहे की, अर्जुन कपूर ह्याच्यामुळे या दोघांच्या नात्यात फूट पडली आहे.