Together As One: स्वातंत्र्य दिनानिमित्त 65 गायकांसह संगीतकार ए. आर. रहमान यांनी लॉन्च केले  Special Song; पहा व्हिडिओ
Together As One Song (Photo Credits: YouTube/Screengrab/Twitter)

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) संगीतकार ए.आर. रहमान (A. R. Rahman) याने 'Together As One' हे खास गाणे रसिकांच्या भेटीला आणले आहे. या गाण्यात तब्बल 65 गायकांचा सुरेल आवाज ऐकायला मिळत आहे. रोजा सिनेमातील भारत हमको जान से प्यारा है या गाण्याचे हे नवे व्हर्जन आहे. हे गाणे यूनाइटेड सिंगर्स चॅरिटेबल ट्रस्ट'द्वारे (United Singers Charitable Trust) तयार करण्यात आले असून श्रीनिवास, पी. उन्नीकृष्णन, सुजाता, राहुल नंबियार आणि रणजित हे ट्रस्टचे मुख्य सदस्य आहेत. (आपल्या जादुई आवाजाने जगभरातील तमाम लोकांना वेडं लावणारे सुप्रसिद्ध गायक ए.आर.रहमान यांची बॉलिवूडमधील '5' अविस्मरणीय गाणी)

हे गाणे ए.आर.रहमान याने ट्विटरवर शेअर करत लिहिले, "Together As One ही भावना अत्यंत आनंददायी आहे. या कठीण काळात एकात्मता दाखवणारे हे गाणे आहे. याच कारणासाठी Thamizha Thamizha हे गाणे पुन्हा एकदा रिप्रेफ करण्यात आले असून या गाण्यासाठी 65 गायक एकत्र आले आहेत."

A.R.Rahman Tweet:

पहा व्हिडिओ:

दाक्षिणात्य संगीत विश्वातील लोकप्रिय गायकांचा यात सहभाग आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या 5 भाषा या गाण्यात ऐकायला मिळतात. या गाण्याचे शूट प्रत्येक गायकाने आपल्या घरातून केले असल्याची माहिती युट्युब डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. या गायकांनी हे गाणे सादर करुन यंदाचा स्वातंत्र्यदिन रसिकांसाठी नक्कीच खास केला आहे.