Happy Birthday AR Rahman: आपल्या जादुई आवाजाने जगभरातील तमाम लोकांना वेडं लावणारे सुप्रसिद्ध गायक ए.आर.रहमान यांची बॉलिवूडमधील '5' अविस्मरणीय गाणी
AR Rahman (Photo Credits: WIkimedia Commons)

A R Rahman 53rd Birthday: बॉलिवूड, टॉलिवूड मध्ये आपल्या सूरांची जादू पसरवलेल्या जगप्रसिद्ध गायक ए.आर. रहमान यांचा आज 53 वा वाढदिवस. ए.आर. रहमान यांचे पूर्ण नाव अल्ला रक्खा रहमान मात्र त्यांचे संगीत क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान पाहून ते पुढे ए.आर.रहमान असेच प्रसिद्ध झाले. उत्तम संगीतकरा, गायक आणि गीतकार या तीनही भूमिका अगदी समर्थपणे पेलणा-या ए.आर. रहमान यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. हिंदी शिवाय त्यांनी अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत दिले. रहमान हे गोल्डन ग्लोब पुरस्काराने सन्मानित केले गेलेले पहिले भारतीय आहेत. ए.आर.रहमान हे पहिले भारतीय आहेत ज्यांना ब्रिटीश भारतीय फिल्म स्लमडॉग मिलेनियर चित्रपटाच्या संगीतासाठी तीन ऑस्कर नामांकन मिळाली.

ए.आर.रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 मध्ये भारतात झाला. जन्मावेळी त्यांचे नाव ए.एस. दिलीप कुमार असे होते. त्यानंतर त्यांनी ते बदलून ए आर रहमान असे ठेवले. रहमान यांना संगीताचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. ए.आर रहमान यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना संगीत दिले. त्यांची अनेक गाणी आजही लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात.

पाहूयात त्यांची सर्वोत्कृष्ट 5 हिंदी गाणी:

1. वंदे मातरम (Vande Mataram)

2. दिल से रे (Dil Se Re)

हेदेखील वाचा- ए. आर. रहमान साठी काहीही! चाहत्याने चक्क समर्पित केली आपली 'ड्रीम कार'

3. जय हो (Jai Ho)

4. मुक्काला मुकाबला (Mukkamukkala Mukkabala)

5. कुन फाया (Kun Faya)

1991 मध्ये रहमान यांनी आपले स्वत:चे म्यूझिक रेकॉर्ड करणे सुरु केले. 1992 मध्ये त्यांना मणीरत्नमच्या 'रोजा' चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचे काम मिळाली. त्यानंतर त्यांची सुरु झालेली यशस्वी घोडदौड आजही कायम आहे. अशा या हुशार, सूरांचा बादशहा ए.आर.रहमान यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा