ए. आर. रहमान साठी काहीही! चाहत्याने चक्क समर्पित केली आपली 'ड्रीम कार'
A.R.Rehman (Photo Credits: Facebook)

गायक ए.आर. रहमानच्या आवाजाची भुरळ केवळ भारताला पडली नसून देश-विदेशातील लोकांना देखील त्याच्या गाण्यांनी  अक्षरश: वेडं लावलयं. मग अशा या आपल्या लाडक्या गायकासाठी काहीही करण्याची त्याच्या चाहत्यांची तयारी असते. ए.आर. रहमानच्या आयुष्यात असे अनेक चाहते वाट्याला आले असतील, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र ऑस्ट्रेलियात राहणा-या एका भारतीय चाहत्याने चक्क आपली ड्रीम कारच गायक ए.आर.रहमान यांना समर्पित केली आहे. त्याने आपल्या गाडीच्या लायसेंस प्लेटवर I Love(Heart Emoji) ARR असे लिहिले आहे. ह्या चाहत्याने Z4सीरिजची बीएमडब्ल्यू (BMW)ही कार विकत घेतली आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपला हा आनंद व्यक्त केला.

आपल्या चाहत्याचे आपल्या प्रती एवढे प्रेम बघून ए.आर. रहमान ने ही त्याच्या ह्या ट्विटला उत्तर देत जपून गाडी चालवा असा बहूमोल सल्ला देखील दिला आहे. ह्या चाहत्याने लाल रंगाची Z4सीरिजची बीएमडब्ल्यू कार घेतली आहे.

हा फोटो त्याने ट्विटरवर पोस्ट करुन खाली म्हटले आहे की, "ए.आर. रहमान मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. आज मी माझी ड्रीम कार विकत घेतली, ज्याला मी खूप दीर्घकाळ जपून ठेवू इच्छितो. त्यामुळे माझी अशी इच्छा होती की, माझ्या ड्रीम कार माझ्या आदर्शाच नाव असले पाहिजे. आपल्या संगीताने माझे आयुष्य बदलविल्याबद्दल मी तुमचा शतश: आभारी आहे."

ह्या ट्विटला उत्तर देत स्माईलिंग इमोजीसह जपून गाडी चालवा असा सल्ला गायक ए.आर.रहमान यांनी दिला आहे.

Google Maps वरुन पत्ता शोधून चाहत्याचा अक्षय कुमार याच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न; चाहत्याला अटक

ए.आर.रहमान यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, इंग्रजी अशा अनेक चित्रपटाला संगीत दिले आहे. तसेच बरीच हिट गाणी सुद्धा दिली आहेत. इतकच नव्हे तर 'ले मस्क' ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शानची धुरा देखील सांभाळली.