Google Maps वरुन पत्ता शोधून चाहत्याचा अक्षय कुमार याच्या बंगल्यात घुसण्याचा  प्रयत्न; चाहत्याला अटक
Akshay Kumar (Image Credit: Yogen Shah)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अंकित गोस्वामी (Ankit Goswami) असे या तरुणाचे नाव असून तो हरयाणाचा (Haryana) रहिवासी आहे.

अंकित हा अक्षय कुमारचा चाहता असून त्याला भेटण्याच्या इच्छेने त्याने बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. केवळ अक्षयला भेटण्यासाठी तो हरयाणाहून मुंबईला आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अंकितने गुगल मॅपवरुन अक्षयचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याच्या जुहू परिसरातील बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले. तरीही आत जाण्याचा त्याचा हट्ट सुरुच होता. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी अक्षयच्या बंगल्याबाहेरुन त्याला ताब्यात घेतले.