बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांनी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) आता धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्व मेहता (Apoorva Mehta, CEO of Dharma Productions) यांची तब्बल तीन तास चौकशी केली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन जबाबत नोंदवायला सांगितला होता. तसेच सुशांत आत्महत्याप्रकरणाची सीबीय चौकशी करण्यात यावी, अशा मागणींनी अधिक जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवले होते. सुशांतने वांद्र्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला होता. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नेमका का केली? त्याला नेमके कोणत्या गोष्टीची चिंता होती? त्याला नैराश्य आले होते का? अशा प्रशांची उत्तरे सध्या मुंबई पोलीस शोधत आहेत. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता महेश भट्ट यांनी मुंबई पोलिसांना दिली 'ही' माहिती
एएनआयचे ट्वीट-
Mumbai: Apoorva Mehta, CEO of Dharma Productions, has left the Amboli Police Station after being questioned for 3 hours in connection with Sushant Singh Rajput death case. #Maharashtra https://t.co/Gm5Ay5mE7b
— ANI (@ANI) July 28, 2020
सुशातच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 40 लोकांची चौकशी केल्याची समजत आहे. यात आदित्य चोपडा, संजय लीला भंसाली, रिया चक्रवर्ती, महेश भट्ट यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी करत आहेत. त्यानंतर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीही याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे गृहमत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.