Anushka Sharma चा बॉडीगार्ड प्रकाश सिंह घेतो गलेलठ्ठ पगार; ऐकून तुम्हीही व्हाल चकीत
Virat Kohli, Anushka Sharma and Baby Vamika (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूड स्टार्सची कमाई ऐकून सर्वसामान्यांच्या भुवया उंचावतात. परंतु, लाईफस्टाईल मेटेन करण्यासाठी त्यांना तितके पैसे खर्चही करावे लागतात. सौंदर्य, फिटनेस, सुरक्षितता यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. सध्या अनुष्का शर्मा (Anushka Sharma) च्या बॉडीगार्डच्या वेतनाविषयी अनेक बातम्या समोर येत आहेत. अनुष्का शर्मा हिचा बॉडीगार्ड प्रकाश सिंह (Prakash Singh) याचे वेतन ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. (Aamir Khan च्या '3 इडियट्स' चित्रपटात Kareena Kapoor ने केलेल्या भूमिकेसाठी Anushka Sharma ने दिली होती ऑडिशन)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची लोकप्रियता अफाट आहे. त्यांचे चाहते देखील असंख्या आहेत. यश आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातच आता चिमुकलीचे आगमन झाल्याने अधिक खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे कुठेही जाताना त्यांच्यासोबत बॉडीगार्ड असतोच. अनुष्का शर्माचा बॉडीगार्ड प्रकाश उर्फ सोनू याला वन आर्मी म्हटले जाते. तो अनेक वर्षांपासून अनुष्का सोबत आहे. त्यामुळे त्याची फीजही तगडी आहे. रिपोर्टनुसार, प्रकाश सिंह याला वर्षाला 1.2 कोटी रुपये मानधन दिले जाते. विशेष म्हणजे प्रकाश सिंह उर्फ सोनू ला अनुष्का शर्मा कुटुंबातील सदस्याप्रमाणेच वागणूक देते.

दरम्यान, 11  डिसेंबर 2017 मध्ये विराट-अनुष्का इटलीत विवाहबद्ध झाले. त्यानंतर साधारणपणे 3 वर्षांनंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्काने मुलगी वामिकाला जन्म दिला. नुकताच तिचा हाफ बर्थडे विरुष्काने साजरा केला. अद्याप वामिकाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली नसल्याने चाहते त्या प्रतिक्षेत आहेत. सध्या विराट आणि अनुष्का आपल्या मुलीसह इंग्लंडमध्ये आहेत.