ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर Anushka Sharma ची 'टीम इंडिया'साठी खास पोस्ट!
Virat Kohli and Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकत भारताने नवा इतिहास रचला. 1948 नंतर भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर अभिनेत्री आणि कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) 'टीम इंडिया'साठी खास पोस्ट केली आहे.

त्यात तिने लिहिले की, "ते आले आणि त्यांनी जिंकले. या संघाने इतिहास रचला. संघातील सर्वच खेळाडूंना खूप शुभेच्छा!" ही पोस्ट करताना पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक करायला मात्र अनुष्का विसरली नाही. "तुझ्यासाठी खूप खुश असून मला तुझा खूप अभिमान आहे," अशा शब्दांत तिने विराटचे कौतुक केले आहे.

विराटने या ऐतिहासिक विजयाचा आनंद पत्नीसोबत असा साजरा केला.

 

View this post on Instagram

 

Celebration Post Winning A Historic Game Is Mandatory #viratkohli with his Gorgeous wife #anushkasharma

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

विराट-अनुष्का नेहमीच एकमेकांच्या कामाचे कौतुक करत असतात. 'झीरो' सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही विराटने खास पोस्ट करत अनुष्काचे कौतुक केले होते.