सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर बॉलिवूड विश्वावरही शोककळा; अनुष्का शर्मा, करण जोहर, रितेश देशमुख यांच्या सह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची ट्विटरच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली
Bollywood celebs mourn the loss of BJP leader Sushma Swaraj (Archived, edited, Representative Images)

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचे काल (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हदयविकाराच्या झटका आल्याने त्यांनी दिल्लीतील एम्स (AIMS) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भाजप पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या सुषमा स्वराज्य यांनी 2014-2019 या काळात परराष्ट्र मंत्रीपद भूषवले. (सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना)

सुषमा स्वराज यांच्या अचानक झालेल्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड कलाकारांनीही ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, लता मंगेशकर, जावेत अख्तर, सनी देओल, रितेश देशमुख, करण जोहर, परिणीती चोप्रा यांच्या सह अनेक सेलिब्रेटींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज दुपारी 3 वाजता होणार अंत्यसंस्कार)

अनुष्का शर्मा ट्विट:

लता मंगेशकर ट्विट:

रितेश देशमुख ट्विट:

करण जोहर ट्विट:

परिणीती चोप्रा ट्विट:

सनी देओल ट्विट:

जावेत अख्तर ट्विट:

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 मध्ये झाला होता. त्यांनी अंबाला येथील एसडी कॉलेजमधून बीए पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर चंडीगड येथून वकीलीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1974 पासून त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली.