ANTIM Trailer: सलमान खान च्या 'अंतिम' सिनेमाचा ट्रेलर आऊट; पुन्हा एकदा पाहायला मिळणार भाईचा दमदार अंदाज (Watch Video)
ANTIM: The Final Truth Trailer (Photo Credits: Youtube)

सलमान खान (Salman Khan) च्या 'अंतिम- द फायनल ट्रुथ' (ANTIM: The Final Truth) सिनेमाचा ट्रेलर (Trailer) प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील सलमानच्या फर्स्ट लूक पासूनच या सिनेमाची चर्चा होती. अखेर आज ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात पुन्हा एकदा सल्लू भाईचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. यात सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून आयुष शर्मा (Aayush Sharma) गॅंगस्टरच्या भूमिकेत आहे. सिनेमाची कथा गॅंगस्टर भोवती फिरत आहे. सलमानची दमदार स्टाईल, हटके डॉयलॉग्स, अॅक्शन सीन्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील, यात शंकाच नाही.

सलमान खान फिल्मसची ही निर्मिती असून महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यात अनेक मराठी कलाकारही पाहायला मिळत आहेत. सयाजी शिंदे, सचिन खेडेकर, उमेश जगताप हे मराठमोळे चेहरे ट्रेलर मध्ये दिसत आहेत. सलमान खान ने देखील ट्विटद्वारे अंतिम सिनेमा ट्रेलर शेअर केला आहे. (Antim Poster Out: सलमान खान याचा आगामी सिनेमा 'अंतिम' चे पोस्टर प्रदर्शित)

सलमान खान ट्विट:

पहा ट्रेलर:

हा सिनेमा 26 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहं सुरु करण्यास परवानगी मिळाल्यामुळे या सिनेमाचा आस्वाद प्रेक्षकांना थिएटरमध्ये जावून घेता येणार आहे. दरम्यान, मराठीतील गाजलेला सिनेमा मुळशी पॅटर्न चा हा रिमेक असल्याने या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.