Animal Movie Official Video: नव्या वर्षात रणबीर कपूर आगामी चित्रपट 'ॲनिमल' मधून झळकणार, दिग्दर्शक यांनी प्रदर्शित केला व्हिडिओ
Animal Movie (Photo Credits-Twitter)

Animal Movie Official Video: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. तर रणबीर याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'ॲनिमल' या चित्रपटातून रणबीर कपूर याच्यासह अनिल कपूर, परिणीती चोपडा, बॉबी देओल सुद्धा दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर सिंह चे डायरेक्टर संदीप रेड्डी यांनी केले आहे. अनिल कपूर, परिणिती, बॉबी आणि दिग्दर्शक संदीप यांनी चित्रपटाचा ऑफिशिअल व्हिडिओ प्रदर्शित केलाा आहे. परंतु या व्हिडिओ मध्ये रणबीर कपूर याचा आवाज ऐकू येत आहे.

व्हिडिओमध्ये रणबीर असे बोलताना दिसून येतो की, बाबा तुम्ही पुढील जन्मात तुम्ही माझा मुलग व्हा. त्यानंतर पहा मी किती तुमच्यावर प्रेम करेन आणि तुम्ही शिका. कारण त्यावेळी पुन्हा मी मुलगा आणि तुम्ही बाबा असाल. या पद्धतीचा रणबीरचा आवाज ऐकून स्पष्ट होते की, तो मुलाची भुमिका साकारणार आहे.(Happy New Year 2021: अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सारा अली खान यांच्या सह 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींजनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!)

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

तर रणबीर कपूर हा त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्ट, आई नीतू कपूर, बहीण रिद्धिमा कपूर यांच्यासह न्यू एअरच्या सेलिब्रेशनसाठी जयपुरला गेल्याचे दिसून आले. आलियाने हिने आपल्या इंन्स्टाग्रामवर जयपूर ट्रिपचे फोटो सुद्धा शेअर केले होते. आलिया आणि रणबीर यांच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास हे दोघे त्यांचा आगामी चित्रपट 'ब्रम्ह्मास्र' मध्ये दिसून येणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासह अमिताभ बच्चन ही मुख्य भुमिकेत झळकणार आहेत.