Sayaji Shinde Health Update: सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी; अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलं तब्येतीसंदर्भात अपडेट (Watch Video)
Sayaji Shinde Health Update (PC - Instagram)

Sayaji Shinde Health Update: प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे असल्याचे निदान झाले. नुकतीच अँजिओप्लास्टी (Angioplasty) ही करण्यात आली होती आणि आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 65 वर्षीय अभिनेत्याला 11 एप्रिल रोजी सातारा येथील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी, अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो रुग्णालयात दिसत आहे. त्याने आपले आरोग्य अपडेट त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे. यात अभिनेत्याने सांगितलं आहे की, ते स्थिर असून काळजी करण्याची गरज नाही.

नमस्कार, मी बरा आहे. माझ्यावर प्रेम करणारे सर्व चाहते, माझे हितचिंतक माझ्यासोबत आहेत, आता काळजी करू नका. मी लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहीन... धन्यवाद, असं कॅप्शनही सयाजी शिंदे यांनी आपल्या पोस्टला दिलं आहे. (हेही वाचा -Actor Arulmani Passed Away: तामिळ अभिनेता, राजकारणी अरुलमणी यांचे चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन)

त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच त्याच्या हितचिंतकांनी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. 'लवकर बरे व्हा' अशा संदेशांसह चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट केल्या आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayaji Shinde (@sayaji_shinde)

सयाजी शिंदे यांनी मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सयाजी शिंदे त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखले जातात. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका केल्या आहेत. अभिनेता चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. शूल, कुरुक्षेत्र, आंध्रडू, अरुंधती आणि घर बंदुक बिर्याणी यांसारख्या अनेक चित्रपटांमधील अभिनेत्याच्या भूमिकांना चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.