फेमिनाच्या मुखपृष्ठावर अमृता फडणवीसांची वर्णी
अमृता फडणवीस (Photo Credit : Twitter)

फेमिनाच्या मृखपृष्ठावर आपणही झळकावे, ही अनेक मॉडेल, अभिनेत्रींची इच्छा असते. फेमिना मॅगझिनच्या कव्हरपेजवर दरवेळेस नव्या अभिनेत्रीचे सौंदर्य, हटके अंदाज तर कधी बोल्डनेस पाहायला मिळतो. पण यावेळेस मात्र अभिनेत्रींऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मृखपृष्ठावर झळकत आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या मासिकावर अमृता फडणवीस यांची वर्णी लागली आहे. या फोटोत त्यांनी काळ्या रंगाचा मॉडर्न गाऊन परिधान केला आहे. मोकळ्या केसात त्या मॉडेलपेक्षाही काही कमी वाटत नाही.

अमृता फडणवीस गायिका म्हणून आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. अल्बममध्ये किंवा कार्यक्रमात गाताना आपण त्यांना पाहिले आहे. परंतु, त्यांचा हा अंदाज नव्याचे सर्वांसमोर येत आहे. फेमिना कव्हर पेजवरील फोटोमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

कव्हरपेजवरील फोटो खुद्द अमृता फडणवीस यांनी शेअर केला असून त्यांनी लिहिले आहे की, "आपल्यापैकी सर्वचजण मोठ्या गोष्टी करु शकतात असे नाही. पण आपण लहान सहान गोष्टीही प्रचंड प्रेमाने करु शकतो." त्यांच्या या ट्विटला अनेक प्रतिक्रीया मिळाल्या आहेत.

यापूर्वी 2016 मध्ये मुख्यमंत्र्यांची पत्नी मॉडेलिंगच्या क्षेत्रातही पदार्पण करणार का ? यावर चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्या मॉडर्न अंदाजामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. रिव्हर अँथम या गाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी केलेला अभिनयही विशेष गाजला होता.