Amitabh Bachchan Sold Bungalow: अमिताभ यांनी विकला दिल्लीतील 'सोपान' बंगला, जाणून घ्या किती कोटींचा झाला सौदा
Amitabh Bachchan (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे आलिशान बंगले अनेकदा चर्चेत असतात. प्रतीक्षा (Pratiksha) आणि जलसा (Jalsa) व्यतिरिक्त बिग बींची अनेक घरे आहेत, त्यापैकी एक त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचा दक्षिण दिल्लीतील गुलमोहर पार्क परिसरात असलेला बंगला आहे. ज्यामध्ये त्यांचे आई-वडील राहत होते पण आता अमिताभ बच्चन यांनी हे घर मोठ्या किंमतीला विकले आहे. सोपान असे या बंगल्याचे नाव आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी दक्षिण दिल्लीतील गुलमोहर पार्कमध्ये असलेली त्यांची मालमत्ता सोपान 23 कोटींना विकली आहे. 1980 मध्ये त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि त्यांची आई तेजी बच्चन या घरात राहत होते, परंतु आता बंगाल बराच काळ रिकामा होता, आता ही मालमत्ता बिगबी यांनी नेझोन ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओ अवनी बदर यांना विकली आहे.

हा बंगला कोणी विकत घेतला हे सांगण्यात येत आहे. या बंगल्याजवळ राहणारे ते अमिताभ यांचे शेजारी आहेत आणि बच्चन कुटुंबाशी त्यांचे विशेष नाते आहे, त्यामुळे त्यांनी अमिताभ बच्चन यांचे वडिलोपार्जित घर विकले आहे. या मालमत्तेची नोंदणी 7 डिसेंबर 2021 रोजी झाली असल्याचे सांगितले जात आहे, परंतु विक्रीचे कारण काय आहे याची माहिती समोर आलेली नाही. तर रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन या घराशी खूप संलग्न होते. या बंगल्याला तेजी बच्चन यांचे नाव देण्यात आले. (हे ही वाचा Jhund Realse Date: अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा 'झुंड' 4 मार्च 2022 रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला)

अमिताभ बच्चन अनेक बंगल्यांचे मालक 

अमिताभ बच्चन यांचे मुंबईत 5 बंगले आहेत. 10 हजार स्क्वेअर फूट पसरलेल्या जलसामध्ये बच्चन कुटुंबीयांसोबत राहतात. दुसऱ्या बंगल्याचे नाव प्रतिक्षा आहे. जलसामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी ते तिथे राहत होते. तिसरा बंगला जनक आहे. जिथे अमिताभ बच्चन यांचे ऑफिस आहे. चौथा बंगला वत्स आहे. याशिवाय अमिताभ यांचे गुरुग्राम आणि फ्रान्समध्येही अपार्टमेंट आहेत. यासोबतच प्रयागराजमध्ये त्यांचे वडिलोपार्जित घरही आहे.

दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते अनेक बॅक टू बॅक चित्रपटांसह मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास तयार आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'ब्रह्मास्त्र' 'झुंड' 'रन वे' 'द इंटर्न' आणि 'गुड बॉय' सारखे चित्रपट आहेत. मात्र, सध्या ते कोविडमुळे कामावरून सुट्टीवर असून त्यांनी नुकतीच ही माहिती दिली होती.