बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 80 वर्षांचे झाले आहेत. परंतु, तरीही ते या टप्प्यावरही कामात तडजोड करत नाहीत. या वयातही अमिताभ बच्चन 12-12 तास सतत काम करत असतात. यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा मिळत असतानाचं त्यांच्या तब्येतीबद्दलची चिंताही त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे. अमिताभ यांनी नुकतेच ट्विट करून त्याच्या चाहत्यांना चिंताग्रस्त केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी रविवारी रात्री ट्विट केलं की, 'हृदयाचे ठोके वाढले आहेत. काळजी वाट आहे. आशा आहे की सर्व काही ठीक होईल.' याशिवाय त्यांनी हात जोडणारा इमोजीही यासोबत पोस्ट केला आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये एवढेचं लिहिलं आहे. सुपरहिरोचे हे ट्विट पाहून चाहते काळजीत पडले. चाहते त्यांना असं ट्विट करण्यामागचे कारण विचारू लागले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते हताश झाले आहेत. (वाचा - प्रसिद्ध गायक Mika Singh शोधतोय आपला परफेक्ट लाइफ पार्टनर, टीव्हीवर लवकरच स्वयंवर सारखा शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला)
मात्र, अमिताभ बच्चन यांची प्रकृती खरच बरी नाही की प्रकरण काही वेगळे आहे? याबाबत अधिक माहिती येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन लवकरच 'झुंड' चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला असून आता चाहते या चित्रपटाच्या ट्रेलर व्हिडिओची वाट पाहत आहेत.
T 4205 - heart pumping .. concerned .. and the hope ..🙏❤️
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 27, 2022
या वयातही अमिताभ बच्चन यांच्याकडे प्रोजेक्ट्सची कमतरता नाही. या काळातही अमिताभ बच्चन यांच्यावर बॉलीवूडचे शंभर कोटी रुपये पणाला लागले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ते लवकरच 'झुंड', 'रनवे 34', Uyarndha Manithan', 'गुड बाय', 'ऊंचाई', 'प्रोजेक्ट के' आणि 'बटरफ्लाई' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहेत.